या कुलवृत्तान्तासाठीं वापरलेली संगणक-प्रणाली   Elescher 8.0 ©
    प्रथम हें लक्षांत घ्यावे की, हा कुलवृत्तान्त mysql मध्ये 'वेब-डेटाबेस' म्हणून तयार केलेला असून तो पूर्णपणे 'dynamic' आहे. पूर्वीच्या कुलवृत्तान्तामधील तयार असलेली छापील (किंवा 'static') पाने यावर दिसत नाहींत. तुम्हाला पाहिजे असलेली माहिती दरवेळीं या डेटाबेसकडून SQL query चें येणारे उत्तर विशिष्ट php module मधून प्रक्रिया करून तुम्हाला हवे त्या प्रकारांत मराठीत स्क्रीनवर दाखविले जाते. प्रत्येक वाचकाला पाहिजे असणारी माहिती वेगळी असल्यामुळे त्याची SQL query ही वेगळी असणार आणि अर्थात्च त्याचे मिळणारे उत्तरही वेगळे.     यावरून हें ध्यानांत येईल कीं या कुलवृत्तान्ताची ठराविक अशी (400-500) पाने नाहीत. तुम्हाला पाहिजेत त्या प्रकाराने पान स्क्रीनवर तयार करण्यासाठी डेटाबेसबरोबर 8-10 php प्रोग्रॅम्स आणि पूरक माहितीची सुमारे 15 पाने आहेत. यांचा वापर करून; (पूर्वीच्या छापील पुस्तक-रूपाने किंवा CD च्या स्वरूपांत, किंवा pdf अथवा jpg format मधील फाइल्स वापरून तुम्हाला जी माहिती मिळूं शकत होती, त्यापेक्षां कितीतरी जास्त माहिती) कितीतरी कमी वेळ घालवून, शोधण्यात वा वाचून काढण्यात बिलकूल वेळ न दडवितां आणि क्षणार्धांत् तुमच्या समोर स्क्रीनवर मांडली जाते. मुख्य फरक म्हणजे या सर्व प्रक्रियेत संगणकाच्या मेंदूकडून शोधकार्य करून घेण्यात येते, म्हणून ते कितीतरी लवकर होवूं शकते.     अशा प्रकारे कुलवृत्तान्त तयार करण्याची संकल्पना पुण्याचे श्री. रवी ओक यांनी प्रथम मांडली व अल्पावधीतच् ती प्रत्यक्षांत उतरवून दाखविली. कोणताही कुलवृत्तान्त हा मूलत: 'dynamic' म्हणूनच असतो. कालानुसार कुलात होणारे नवीन विवाहसंबंध, नवीन बालकांचे जन्म, काही वृद्धांचे निर्वाण, या गोष्टी अखंडपणे सतत चालू राहणारच. त्या 25-30 वर्षांनी केव्हांतरी एकदां संकलित करून पुस्तक-रूपानें प्रसिद्ध करणे हें पूर्णत: अव्यवहार्य आहे. असा कुलवृत्तान्त वाचणे म्हणजे इतिहासातील (30-40 वर्षे सुद्धा जुने असेल) 'वर्तमानपत्र' वाचण्यासारखे आहे. (अगदी स्पष्ट बोलायचे म्हणजे त्याला वर्तमानपत्र देखील म्हणता येणार नाही - कारण वर्तमानपत्र हें वर्तमान काळातील असायला पाहिजे - भूतकाळातील नव्हे)     पूर्वीच्या काळीं जेव्हां 'वेब-डेटाबेस' आणि 'इंटरनेट' या संकल्पनाच अस्तित्वांत नव्हत्या, तेव्हां तो छापण्यावाचून गत्यंतरच नव्हते; पण आज 21 व्या शतकांत उपलब्ध झालेल्या सुविधा न वापरणे हेंच मुळी चुकीचे आहे. तसेंच कुलवृत्तान्त छापील स्वरूपांत तयार करून त्याची CD किंवा pdf/jpg फाइल्स साइटवर पहाण्यासाठीं ठेवणे हें म्हणजे 'वीज घेतलेल्या घरांत दिवा लावण्यासाठीं रात्री बटण दिसत नाही म्हणुन कंदील लावण्यासारखेच' होईल. सारांश काय तर कुलवृत्तान्तासाठीं आजच्या युगांत 'वेब-डेटाबेस' शिवाय पर्याय नाही. तशाच 'टेलिफोन-डिरेक्टरी' सारखा इतर 'dynamic' माहिती-साठा दाखविण्याकरितां 'छापील-डिरेक्टरी' (आणि CD सुद्धा) पूर्णत: कालबाह्य आहेत. भारतासारख्या 'विकसनशील' देशांत देखील गेली 4-5 वर्षे कोणत्याही ठिखाणचे अद्ययावत् फोन-नंबर्स इंटरनेट-सर्च वापरून बिनचूनपणे क्षणार्धात् मिळू लागलेत. काळाची पावले वेळीच ओळखून 'नातू' कुल-मंडळाने घेतलेला हा योग्य निर्णय घेतलेला आहे.     कुलवृत्तान्ताची संगणक-प्रणाली: Elescher 8.0 © लेखक: रवी ओक. 29 आदर्श सोसायटी पुणे 411037 ☎ : (20) 2426-5648 e-mail: elescher@vsnl.com     डेटाबेस प्रणाली: MySQL 5.2 ; script used: PHP 5.0 (both Open Source Softwares)     देवनागरी साठी: Unicode Standard utf-8 (any devanagari unicode font) in Baraha Direct.     छापील पुस्तक वाचण्याऐवजी, 'इंटरनेट वापरून वेब-डेटाबेस पाहणे' ही कल्पना कदाचित् ज्येष्ठ पिढीतील काही जणांना सुरवातीला जरा अवघड वाटेल (कारण त्यांनी आजपर्यंत कदाचित् संगणकच हाताळलेला नसेल). 'आमच्या कोंकणातल्या नातेवाइकांना हा कसा पाहतां येईल?' असा प्रश्नही काही जणांच्या मनांत उत्पन्न होईल. हे प्रश्न ज्यांच्या मनांत येतात त्यांनी प्रथम त्यांच्याच आसपासच्या लोकांची दिनचर्या पहावी. आज 21 व्या शतकांत भारतातील खेडोपाडी लोक मोबाइल फोन वापरतात (सुरवातीला ते नवखे असले तरी त्यांनी हें नवे तंत्रज्ञान शिकून घेतले), गल्लीतल्या छोट्या वाण्याच्या दुकानांत सुद्धा कॅल्क्युलेटर शिवाय हिशेब होत नाहीत, रेल्वे/एस्-टी चे रिझर्वेशन जवळच्या सायबर-कॅफे मध्ये होते, 10वी-12वी नंतर कॉलेज प्रवेश घेण्याकरतां हल्लीच्या पिढीतील मुलांना on-line प्रवेश-प्रक्रिया पार पाडावी लागते, कित्येक घरांत डिश-टीव्ही वर inter-active पद्धतीनें मुले खेळ खेळतात; आणि हे सर्व निव्वळ पुण्या-मुंबईत नाहीं तर अगदी खेड्यांत सुद्धा. (थोडक्यात काय जमाना बदलला आहे; 50-60 वर्षांपूर्वीचे कोंकणाचे चित्र आज नाही. आजचे कोकण हे 'आजचे' म्हणूनच आहे) थोडक्यात काय - खेडेगावच्या आजोबांना सुरवातीला जरी इंटरनेट वर 'नातू' कुलवृत्तान्त पहायला कठिण वाटले तरी त्यांचा 'नातू' त्यांना निश्चित मदतीला येईल आणि दोन-तीन दिवसांत तो 'नातू' मदतीला तयार असला तरी आजोबा एकट्याने 'नातू'-कुलवृत्तान्त' पाहूं शकतील. आणखी एका वर्षानें कदाचित् कोणत्याही आजोबांना हा प्रश्न पडणार नाही (नातवाला तर बिलकूल नाही)!