गोळे मंडळींचा मुख्य व्यवसाय इंजिनीअर्स, डॉक्टर्स, न्यायाधिश (आणि
मुनसफ), वकील, प्रोफेसर्स,शिक्षक, शेती हे होत.
- विनायक महादेव गोळे (२/९) पेशवाईमध्ये हे एक प्रसिद्ध कवी होते.
-
वासुदेव विठ्ठल गोळे (२/१२) (१८७१-१९३३) (पृ.१०८). सातार्याच्या
सुप्रसिद्ध "वेस्टर्न लाईफ इन्शुअरन्स कंपनी"चे हे एक मूळ संस्थापक होते.
श्री. चिरमुले ह्यांच्याबरोबर हे होते. हीच कंपनी पुढे १९७० पासून "लाईफ
इन्शुअरन्स कॉर्पोरेशन ओफ इंडिआ" (L.I.C.) म्हणून प्रसिद्ध झाली.
-
विष्णू विठ्ठल (३/१०),(ज्न्म १८७९),(पृ. ११४). ब्रिटिश मिलिटरीमध्ये
डॉक्टर होते व लेफ्टनंट होऊन १९३२ मध्ये निवृत्त झाले.१९२० मध्ये "ऑर्डर
ऑफ ब्रिटिश ऑफ इंडिआ बहादूर" ही पदवी यांना मिळाली.
-
माधव लक्ष्मण (३/१०) (१८७१-१९०६) (पृ. ११६) यांना बिंदुमाधव किंवा
बापू म्हणत असत. नाट्यकला प्रर्वतक मंडळींतील प्रसिद्ध नट. इंदूर (होळकर)
दरबारांतील गवई होते. सर्कसवाले काशिनाथ छत्रे यांचा विशेष सहवास होता.
शीघ्र कवी. महिम्न, अष्टपदी. पंचपदी इ. संस्कृत स्तोत्रांचा मराठींत
पद्यरूपी अनुवाद ह्यांनी केला.
-
चिंतामण विठ्ठल गोळे (४/१३) (१९२१-१९८१) (प. १२१). यांना राजाभाऊ
म्हणून संबोधिले जात असे. पुणे विद्यापीठाचे व गव्हमेंट इंजिनीअरिंग
कॉलेज पुणे येथून फर्स्ट क्लासमध्ये बी.ई. (सिव्हिल) ही पदवी त्यांनी
मिळविली. डेन्मार्कमधून उच्च सिक्षण घेतले. खडकवासला, पुणे येथील
"Central Water and Power Commission" या भारत सरकारचे संशोधन खात्यात
क्लास वन इंजिनिअर-ऑफिसर म्हणून रुजू झाले. आपल्या कर्तब्गारीने कांही
वर्षांतच ते तिथले प्रमुख झाले. त्यांच्या हाताखाली १५-२० चीफ इंजिनिअर
असत, इतका त्यांना अधिकार लाभला. पुढे तर ते त्या कमिशनचे मेंबर म्हणून
बढतीवर दिल्ली येथे गेले.आणि तेथून ते निवृत्त झाले. निरनिराळ्या
प्रकल्पांची मॉडेल्स बनवून त्यांच्यावर परीक्षा घ्यावयाच्या, आणि योग्य
ती डिझाईन्स तयार करून त्याप्रमणे प्रकप उभारावयाचा, असे कमाचे मुख्य
स्वरूप असावयाचे. मोठमोठे बंधारे, पोर्ट्स, पूल, इत्यादि कामांसंबंधी ते
उच्च तज्ञ म्हणून ओळखू जाऊ लागले. पोर्ट्स (बंदरे) हे तर त्यांचे पेटंट
काम असावयाचे. हिराकूड डॅम, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट,नवी मुंबई,
मंगलोर व कांडला येथील बंदरे (पोर्ट्स) हे त्यांचे विशेष प्रकल्प
प्रसिद्ध आहेत. तत्सम कामांनिमित्तांने त्यांनी बरेच वेळा परदेशांस भेटी
दिल्या. जगातील विविध प्रकल्पांवर त्यांनी मार्गदर्शन केले. या सर्व
बाबतीत त्यांना जागतिक कीर्ति लाभली. जगातल्या विविध प्रसिद्ध इंजिअरिंग
मासिकांतून त्यांनी ह्या सर्व संशोनावर विपुल असे लेखन केले. जवळ्जवळ १००
संशोधनपर लेख त्यांनी लिहिले.
-
नारायण विनायक गोळे (४/१२) (१८६५-१९१२) (प.१२२) नाशिक येथे वकिली
व्यवसाय सुरु करून नंतर ते सरकारी वकील बनले. नाशिक म्युनिसिपालिटीचे ते
पांच वर्षे अध्यक्ष होते. १९०२ मध्ये विलायत येथे झालेल्या राज्यरोहणाचे
समारंभास ते गेले होते. त्या वेळीं त्यांना "रावबहादूर" ही विशेष पदवी
बहाल केली गेली. शेती व बागायती करणेचा त्यांना विशेष छंद होता.
-
महादेव शिवराम गोळे (४/१२) (१८५२-१९०७) (पृ.१२३) त्या काळांत ते
बी.ए.व एम.ए.(सायन्स) झाले. डेक्कन एजुकेशन सोसायटीचे ते आजीव सभासद
होते. लोकमान्य टिळक, आगरकर यांचेबरोबर ते कार्यरत होते. आगरकरांचे नंतर
ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य झाले.यांच्या विशेष प्रयत्नांमुळे
फर्ग्युसन कॉलेजला शास्त्रीय क्षेत्रांत मुंबई इलाख्यांत पहिल्या प्रतीचे
स्थान मिळाले. "ब्राह्मण व त्यांची विद्या" हे त्यांचे पुस्तक विशेष
लोकप्रिय झाले. याशिवाय त्यांचीं आणखीं कांहीं पुस्तके प्रसिद्ध होती.
शिवाय शास्त्रीय विषयांवरील लेख व केसरी वर्तमान पत्रांत त्यांनी विपुल
लेखन केले. १९०२ मध्ये निवृत्त होऊन मध्य प्रांतांत हरद्याजवळ पिट्गांव
येथे शेतजमिनी खरेदी करून शेती करत होते.
-
गोपाळ शिवराम गोळे (४/१२) (ज.१८६५-) (पृ. १२५) १८६५ मध्ये डेक्कन
कॉलेजमधून बी.ए. , मुंबईस शिक्षक म्हणून काम करताना एल.एल.बी. अभ्यास
सुरू असतानाच इंदूर (होळकर) दरबारांत नोकरी मिळाली. १९०८ मध्ये सेकंड
जज्ज, झाले. पुढे नेमाड जिल्यांत फर्स्ट ग्रेड सिनिअर डिस्ट्रिक्ट व
सेशन्स जज्ज म्हणून बढतीवर नेमणूक झाली. १९२२ सालीं निवृत्त झाले.नंतर
बढवाय येथे शेतीकाम करीत असत.
-
विठ्ठल लक्ष्मण गोळे (४/७) (पृ. १२८) हेही नानासाहेब पेशव्यांचे मावस
भाऊ होते. इनामदारी मिळाली.स्वतःच्या कर्तबगारीने पुष्कळ पैसा मिळविला.
पुण्यास सावकारी करीत. १७५० च्या सुमारास २८ लाखांचा आढावा होता. पटवर्धन
सरकारांना व बडोदा गायकवाड सरकारांना वेळोवेळीं पुष्कळ रकमा कर्जाऊ
दिल्या. पेशव्यांनी त्यांना गुजराथ येथे सनदेसर व हरगूर येथेही इनामदारी
दिली होती. अहमादेबादेस भद्र येथे गोळे वाडा पुढेही पुष्कळ वर्षे होता.
१८८० मध्ये त्या ठिकाणी सरकारी कचेर्या केल्या गेल्या.
-
दामोदर मोरो (ऊर्फ दाजीसाहेब) गोळे (४/१०) (१८५१-१९०८) (पृ. १३०)
तिसरा वर्ग सरदार. पुण्यास ऑनररी मॅजिस्ट्रेट. यांची एक मुलगी कृष्णाबाई
ह्या सांगलीस पटवर्धन यांस तर एक मुलगी विठाबाई ह्या तासगांवकर पटवर्धन
यांस दिली होती.
-
प्रकाश विष्णू गोळे (५/१३) हे एक सुप्रसिद्ध पक्षी निरीक्षक म्हणून
मान्यता पावले. ह्यांच्या मातोश्री सौ. पद्मा गोळे प्रसिद्ध कवयित्री
होत्या. ह्यांची आई लक्ष्मी तासगांवकर पटवर्धन सरकारांची मुलगी व त्यांचे
वडिलांचे वडील दामोदर गोळे होत.
-
वसंत हरी गोळे (५/१३) (ज.१९१३,-) (पृ.१३३) बी.ए. नंतर लंडन येथून
उच्च शिक्षण हेऊन परत आले. हे पुणे विद्यापीठचे कित्येक वर्षे कार्यवाह
म्हणजे रजिस्ट्रार होते.
-
चिंतो महादाजी गोळे (७/८) (१७६४-१८१७) काशीस जाऊन ज्योतिष्याचा
अभ्यास केला. त्या वेळी देवतेचे आराधन चालू ठेवले. एके दिवशी सिद्ध
पुरुषाची गांठ पडली. त्यांचे शुभाशिर्वाद मिळवून ते परत पुणे येथे आले.
पूर्वीप्रमाणे वकिलातीत काम करू लागले. ज्योतिषाचा नाद खूपच होता. सखोल
अभ्यासामुळे व सिद्ध पुरुष्यांच्या प्रसादामुळे चिंतोपंतांचे भविष्य
तंतोतंत खरे होऊ लागले. श्रीमंत गोविंदराव महाराज गायकवाड हे पेशव्यांचे
अटकेंत बरेच वर्षे होते. चिंतोपंतांनी वर्तविलेल्या भविष्याप्रमाणे
त्यांना राज्यप्राप्ती झाली. तसेच १७९४ मध्ये अहमदाबाद येथे चालू
असलेल्या युद्धांत त्यांनी वर्तविलेल्या भविष्यकथनाप्रमाणे जयप्राप्ती
झाली. त्यांना वर्षासन मिळाले होते. नवीन देवळे बांधली तर काहींचा
जीर्णोद्धार केला. त्यांचा धर्मतत्वसार हा एक ग्रंथ होता. पुढील
पिढ्यांमधील कांही पुरुषांनी हे ज्योतिषशास्त्र अवगत केले होते.
-
सिद्धेश्वर भास्कर गोळे (८/११) (१८५२-१८९२) (प. १५४) बी.ए. एल.एल.बी.
शिक्षण डेक्कन कॉलेजमध्ये झाले. लोकमान्य टिळकांचे सहाध्यायी. सब जज्ज
म्हणून नोकरी झाली.
-
पुरुषोत्तम बळवंत गोळे (११/१०) (१८८६- ) (पृ. १७०) बी.ए. एल.एल.बी.
वेळंदूर येथे खोत व महाजन. अकोल्यास वकील व १९३६ पासून हायकोर्टचे वकील
म्हणून प्रसिद्ध. अकोला सेंट्रल बॅंकेचे सेक्रेटरी. म्युनिसिपालिटीचे,
बार असोसिएशनचे अध्यक्ष. १९३६ मध्ये दोनदा कारागृहवास भोगावा लागला. १९३७
मध्ये सेंट्रल प्रॉव्हिंन्सचे (मध्य प्रांत व २१ व्या शतकांत महाराष्ट्र)
कौंन्सिलचे आमदार झाले. मातृभूमी साप्ताहिकाचे संपादक. अकोला सेंट्रल
बॅंकेचे` अध्यक्ष अशा विविध पातळींवर नेत्रदीपक कामगिरी केली. लोकमान्य
टिळकांना एका खटल्यांत हायकोर्टांत विजय मिळवून दिला. "गोळे कुल
वृत्तांत" पुस्तकाचे संपादक व प्रकाशक कोते.
-
गजानन बळवंत गोळे (११/१०) (१८९० ) (पृ. १७१) खोत व महाजन. त्या
काळीं एम.बी.बी.एस. डॉक्टर. जर्मन युद्धाचे वेळी तीन वर्षे लढाईवर गेले
होते.कॅप्टन हुद्द्यापर्यंत ते चढले होते. विलायतेस जाऊन डॉक्टरीचे उच्च
शिक्षण घेतले. स्वस्तिकलीग नावांची सेवाभावी संस्था काढली होती.
ठिकठिकाणीं विनावेतन काम केले. धार्मिक प्रवृत्ती होती.