या उपक्रमाची प्रस्तावना-
'कुलवृत्तान्त' म्हणजे 'पुस्तक' ही कल्पना पूर्वीच्या सर्व पिढ्यांमध्ये (निदान छापण्याच्या कलेचा शोध लागल्यापासून) अस्तित्त्वांत होती; या पार्श्व्भूमीवर 'वेबवर डेटाबेस कशाला?' हा प्रश्न काही जणांना कदाचित् पडला असेल. उत्तर खरे म्हणजे प्रश्नांतच दडलेले आहे. मुद्रण-कलेचा शोध तसा अलीकडला म्हणजे हा फारतर 300-400 वर्षांपूर्वीं लागलेला आहे. त्याअगोदर ताम्रपटावर, दगडावर, भिंतीवर, अशा अनेक ठिकाणीं मारतीय, चिनी, इजिप्तशियन अशा प्राचीन संस्कृतींतील इतिहासातील घटना नोंदविलेल्या होत्या- कारण उघड आहे - त्यावेळीं जे माध्यम उपलब्ध होते त्याचा वापर होत गेला. अती-प्राचीन काळापासून कोणतेही माध्यम उपलब्ध नसल्यामुळे 'वेद' हे पिढ्यान् पिढ्या मुखोद्गत स्वरूपांत जतन केले गेले. सारांश काय, त्यावेळीं जें माध्यम सहज उपलब्ध झाले, त्याचा वापर होत गेला. कोणत्याही कुलवृत्तान्ताची पूर्वीची आवृत्ती प्रकशित झाली तेव्हां (इ.स. 1980 च्या सुमारास किंवा त्यापूर्वी) 'इंटरनेट' उपलब्धच नव्हते, मुद्रण हेंच एकमेव माध्यम उपलब्ध असल्यानें, तो छापायलाच लागत होता. आज 21 व्या शतकांत परिस्थिती बदलली आहे, इंटरनेट जगभर (अगदी भारतांत सुद्धा खेडोपाडी) पोहोचलेले आहे आणि आज वेबवर डेटाबेस करून कुलवृत्तान्त करणें, हें तो छापण्यापेक्षां स्वस्त झालेले आहे.
कुलवृत्तान्त 'वेब-डेटाबेस' स्वरूपांत करण्याचें 'स्वस्त' हें एकमेव कारण नाहीं. हा परिच्छेद वाचल्यावर तुमच्या द्यानांत येईल कीं हें 'स्वस्त आणि मस्त' आहे. श्री. गोविंद नारायण गोळे (२/१२) यांनीं १८९५ च्या सुमारास (पृ.१०९) गोळे कुलाच्या वंशावळी जुळवून इतिहास लिहिण्याचा सर्वांत प्रथम प्रयत्न केला. त्यानंतर, "गोळे कुल वृत्तांत" हे पुस्तक १९३७ सालीं पुरुषोत्तम बळवंत गोळे (११-१०) व गोविंद हरी गोळे (११-१०) यांनीं परिश्रमपूर्वक तयार करून छापले.२०१३ सालांत त्याच्या प्रती अगदी थोड्याचजणांकडे असाव्यात. अशी एक प्रत प्रस्तुत लक्ष्मण गोविंद गोळे (४-१४), मोबा. ९८६९३५९९७६, सांगली/वाशी (नवी मुंबई) यांचेकडे आहे. त्यावरूनच गोळे कुलव्रूत्तांत नव्याने ऑन लाईन करण्याची कल्पना सुचली. पुणे येथील श्री. रवी ओक (एम.टेक.) (फोन ०२०-२४२६५६४८) यांनी कुलवृत्तांत तयार करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. सन २०१३ पर्यंत जवळ्जवळ ४० कुलांचे वृत्तांत त्यांनी तयार केलेले आहेत/काम चालू आहे.. त्याचप्रमाणे आपलाही "गोळे कुल वृत्तांत" तयार करावा असा विचार झाला. आमच्या विनंतीनुसार त्यांनी हे काम हातीं घेतले. त्यांची रु. २५,०००/- फी आपण भरली. दि. १६-०४-२०१३ पर्यंत पुस्तकांतील सर्व व्यक्तींचीं नावे भरून दिली. आणि आता kulavruttant.com ह्या त्यांच्या वेब साईटवर "गोळे कुल" ही झळकू लागला आहे. आता कोणीही त्यामध्ये ऑन लाईन फॉर्म भरून, सबमिट केल्यास, ती माहिती २-३ दिवसांत नेटवर दिसू शकते, आणि जगांतून कोणीही, कोठूनही आणि केव्हंही पाहू शकतील. यासंदर्भात अधिक माहितीसाठी, श्री. लक्ष्मण गोविंद गोळे (४-१४), (जन्म १९३८) यांना ९१९८६९३५९९७६ फोनवर आणि/किंवा laxmangole@gmail.com या ईमेलवर केव्हाही संपर्क साधू शकता.
Designed & developed by Dnyandeep Infotech Pvt. Ltd., Sangli