गोळे कुलवृत्तांत
'गोळे' कुलाचा इतिहास
गोळे मंडळी मूळची कोकणांतील गुहागर येथील. (पृ. २१) शिवशाहीच्या काळांत गुहागर व वेळंदूर येथे महाजन म्हणून होते. तेव्हांपासून गोळे पुरुष पेशवाईच्या अखेरपर्यंतच्या काळांत कोकणांत व देशावार राजकीय घडामोडींत भाग घेणारे होते असे म्हणता येईल. पेशवाईच्या काळंत ते सावकार म्हणून देशावर आले. (पृ.९९)चासकर जोशी यांची पहिली मुलगी शिऊबाई ही मोरेश्वर गोपाळ गोळे (१/६) यांना व दुसरी मुलगी काशीबाई ही श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांना दिली. त्यामुळे मोरेश्वर यांचे चौघे सुपुत्र गंगाधर, सदशिव, गोविंद व विठ्ठल हे नानासाहेब पेशवे यांचे सख्खे मावसभाऊ बनले. सातव्या पिढीतील या चौघ्या भावांनी मराठ्यांतर्फे मर्दुमकीही गाजविली. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे पेशव्यांचे पुणे दरबारांत सरदारही बनले. शिवाय इनामदार इत्यादि पदेही भूषवू लागले. उत्तम कामगिरीमुळे ताराऊ राणी (शिवाजी महाराज यांचे सुपुत्र राजे राजाराम यांच्या पत्नी) यांनी या भावांना ठिकठिकाणी इनामदारी बहाल केली. विट्ठल मोरेष्वर गोळे (५/७) (पृ. १२८) ह्यांनी> पटवर्ढन सरदारांना, बडोदा गायाकवाड यांना पुष्कळ रकमा वेळोवेळी कर्जाऊ दिल्या होत्या.
मर्ढे (ता. व जिल्हा सातारा) हे गोळे यांचे मुख्य इनामदारीचे गांव. बंगलोर - पुणे NH-4 ह्या हायवेवर सातारा येथून १५ कि.मी.वर ( ७४४ कि.मी. दगडाजवळ (हे अंतर बंगलोरपासूनचे आहे)) आनेवाडी फाट्यापासून पूर्वेस ३ कि.मी. वर आहे. कृष्णा नदी ओलांडून नदीच्या पूर्व तीरावर वसले आहे. ही इनामदारी साधारणपणे १७५० पासून असावी ती थेट १९५० पर्यंत विनासायास चालू होती. नंतर महाराष्ट्र राज्याचे कूळ कायद्यानुसार बंद झाली. सध्या तेथे गोळे वाडा भग्न अवस्थेत आहे. इनामदारी चालू असती तर श्री. नारायण पंढरीनाथ गोळे (४/११) हे मर्ढ्याचे विद्यमान (२०१३) इनामदार असते. ती जागा व गोळे वाडा पुनः ताब्यांत घेण्याचे खटपटीत ते आहेत. याशिवाय या मुख्य इनामदारी गावाखेरीज कोंढवे, जिहे, अंगापूर (जि. सातारा), चिखल्गांव (जि. पुणे), उंबरडे (जि. ठाणे) इत्यादि ठिकाणींही अंशःता इनामदारी होती.. मात्र या सर्व जमिनी (२०१३) कूळकायद्यांत १०५३ पसून गेल्या. विठ्ठल मोरेश्वर गोळे (५/७) (पृ. १३०) व त्यांचे वंशज हे सरदार गोळे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे वास्तव्य पुण्यामध्ये झाले. इतरही बरीच गोळे मंडळी पुण्यास राहू लागली. २०१३ सालातही बरीच गोळे मंडळी पुण्यांत आहेत.
शिवाय गोळे यांच्या मुली सांगली, मिरज, तासगाव येथील पटवर्धन संस्थानिक यांचेकडे दिल्या, तर त्यांच्या मुली गोळे घराण्यांत आल्या. कृष्णाबाई दामोदर गोळे (५/११) (पृ. १३०), ह्यांना सांगलीकर चिंतामण विनायक पट्वर्धन ह्यांना दिल्या. ह्यांचे सुपुत्र श्रीमंत आप्पासाहेब पतवर्धन हे राजेसाहेब झले (१९१०). त्यांनीं सांगली संस्थानाची सर्वतोपरी उन्नती केली. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाले. आणि भारतांत सांगली संस्थान १९४८ मध्ये विलीन झाले. त्यांम्ध्ये त्यांचा मोठा पुढाकार होता.विठाबाई दामोदर गोळे (पृ.१३०) ह्या तासगावच्या राणीसाहेब झाल्या. त्यांची सुकन्या लक्ष्मीबाई (पृ. १३१) ह्या पुनः गोळे घराण्यांत विष्णू चिंतामण गोळे (५/१२) यांच्या पत्नी म्हणून आल्या. ह्याच सुरसिद्ध कवयित्री सौ. पद्मा गोळे होत. सुप्रसिद्ध पक्षीनिरीक्षक श्री. प्रकाश गोळे (५/१३) हे ह्यांचेच सुपुत्र होत. अमृत लक्ष्मण गोळे (८/१०) (पृ. १५२) हे मिरजकर राजेसाहेब पटवर्धन यांचे जावई झाले. रामचंद् चिंतामण गोळे (७/११), (पृ.१४३) हे राजेसाहेब पटवर्धन ह्यांचे जावई झाले.
याशिवाय स्वातंत्र्यपूर्व काळांत कांहीं गोळे मंडळी राजकीय कारभारातही सक्रीय होती. लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांचे बरोबर स्वातंत्र्ययुध्धांत भागही घेतला. सिध्देश्वर भास्कर गोळे (८/११) (पृ. १५४) (ज.१८५२) हे लो. टिळक यांचे सहाध्यायी होते. पुरुषोत्ताम गोळे (११/१०) (पृ.१५२) (१८८६- ) हे महात्मा गांधी यांचे अनुयायी व सत्याग्रही होते. त्यांना तुरुंगवासही झाला होता. "१९३७ चे गोळे कुलवृत्तंत" पुस्तकाचे ते लेखक होत.
Designed & developed by Dnyandeep Infotech Pvt. Ltd., Sangli © All Rights Reserved करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई