Gole header

-'गोळे' कुलाची कुलदैवते-

गोळे कुल घराणे,शाखा,उपशाखा ः १-१-१. जातेगांवकर. पाडुरंग रामचंद्र (पृ. १००) मुख्य दैवत गोपाळ्कृष्ण. गोकुळअष्टमीचा उत्सव करतात. देवदिवाळीला करंजेश्ररी इ. कोंकणच्या देवतांना नैवेद्य दाखवितात. मुलाचे लग्न झाल्यावर वणीला सप्तशृंगी डोंगरावर असलेल्या देवीच्या दर्शनासाठी जावे लगते.बोडण भरण्याची चाल नाही. मंगल कार्यानंतर व मुलगा झाल्यावर गोधळ घालतात.आश्विन महिन्यांतील देवीच्या नवरात्रांत अखंड दिवा, जोडमाळ् व दहा दिवस सुवासिनीला भोजन असते.

गोळे कुल घराणे,शाखा,उपशाखा ः १-१-२. मर्ढेकर, गंगाधर मोरेश्वर (पृ. १०५) मुख्य देवता श्रीगोपाळकृष्ण असून श्रावणांत जन्माष्टमीस उत्सव करतात. या दिवशीं उपोषण असून नंदादीप लावतात. जाखाय, मानाय, रवळनाथ,्गोविंदराज व करंजाई या कोंकणच्या पांच देवतांना थोरल्या दिवाळीला म्हणजे मार्गशर्ष शुद्ध प्रतिपदेला नैवेद्य घालतात. मुंज, लग्न झाल्यावर पंढरपुरास श्रीविठ्ठलांच्या दर्शनास जातात.

गोळे कुल घराणे,शाखा,उपशाखा ः १-१-३. मर्ढेकर, सदाशिव मोरेश्वर (पृ. ११०) मुख्य देवता श्रीगोपाळकृष्ण असून श्रावणांत जन्माष्टमीस उत्सव करतात. या दिवशीं उपोषण असून नंदादीप लावतात. थोरल्या दिवाळीला करंजेश्व्ररी, गोविंदराज, रवळनाथ, जाखमाता, मानाय, आंबेजोगाई, आणि व्याडेश्वर या सात देवतांना नैवेद्य दाखवितात. लग्न, मुंज झाल्यावर पंढरपुरास श्रीविठ्ठलांच्या दर्शनाश जातात. मुलाचे लग्न झाल्यावर गोंधळ घालतात. याशिवाय केशव आबाजी यांच्या कुटुंबात थोरल्या दिवळींत करंजेश्वरी,गोविंदराज, जाखमाता, दुर्गादेवी, दत्त, वाडेश्वर, विश्वेश्वर भागिरथी,वेणिमाधव, काळभैरव व पंचगंगा या देवतांस नैवेद्य दाखवितात.

गोळे कुल घराणे,शाखा,उपशाखा ः १-१-४. मर्ढेकर, गोविंद मोरेश्वर (पृ. ११८,११९) मुख्य देवता श्रीगोपाळकृष्ण असून श्रावणांत जन्माष्टमीस उत्सव करतात. या दिवशीं उपोषण असून नंदादीप लावतात. देवदिवाळीला करंजेश्व्ररी, गोविंदराज, रवळनाथ, जाखमाता, मानाय, आणि व्याडेश्वर या देवतांना नैवेद्य दाखवितात. लग्न, मुंज झाल्यावर पंढरपुरास श्रीविठ्ठलांच्या दर्शनास जातात. मुलाचे लग्न झाल्यावर गोंढळ घालतात. मुलांच्यासाठी व नवर्‍या मुलींसाठी घागर्‍या, तोरड्या व पैंजण हीं घरची करून घालावयाची नाहीत. नातलगांनी अहेर केल्यास तीं घालण्याला हरकत नाही. सुमरे ५-६ पिढ्यांपासून पंढरपूरची आषाढी व कार्तिकी वारी करण्याचा संप्रदाय पडला आहे.मुलाचे लग्न झाल्यावर त्यास पंढरपूरला सपत्नीक (ओहर) पायां पडण्यास जावे लागते. तेथे देवांची पूजा, सवाष्ण व ब्राह्मण आणि रखमाईला साडी चोळी करून पांदुरंगास अभिषेक कराव लागतो.

गोळे कुल घराणे,शाखा,उपशाखा ः १-१-५. मर्ढेकर, विठ्ठल मोरेश्वर (पृ. १२८) मुख्य देवता श्रीगोपाळकृष्ण असून श्रावणांत जन्माष्टमीस उत्सव करतात. या दिवशीं उपोषण असून नंदादीप लावतात. तसेच कथा कीर्तन व ब्राह्मण भोजन असते. देवदिवाळीला करंजेश्व्ररी, गोविंदराज, रवळनाथ, जाखमाता, मानाय, आणि व्याडेश्वर या देवतांना नैवेद्य दाखवितात. लग्न, मुंज झाल्यावर पंढरपुरास श्रीविठ्ठलांच्या दर्शनास जातात. मुलाचे लग्न झाल्यावर गोंधळ घालतात.

गोळे कुल घराणे,शाखा,उपशाखा ः १-१-६. राहु-पिंपळ्गांवकर (पृ. १३६) करंजेश्वरी, रवळनाथ, जाखाई, जोखाई, गणपती, पिंपळगांवचे सिद्धेश्वर, यमाई, तुकाई या देवांना देव दिवाळीस नैवेद्य दाखवितात. मुंज, मुलाचे लग्न या प्रसंगी बोडण भरतात. अश्विनातील नवरात्रांत अखंड दिवा, माळ, उठती बसती सवाशीण, ब्राम्हण्यांस भोजन. या नवरात्रांत रविवारी पाहुणा खंडोबा यांची तळी भरतात.

Designed & developed by Dnyandeep Infotech Pvt. Ltd., Sangli © All Rights Reserved करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई